खऱ्या आयुष्यात सर्वत्र लग्नाचे सीझन सुरू असतानाच काही टिव्ही मालिकांमध्ये देखील लग्नसोहळे पाहायला मिळत आहेत. 2 आठवड्यापूर्वी “माझा होशील ना?” मालिकेत सई आदित्यचा लग्नसोहळा पाहायला मिळाला. आता कारभारी लयभारी या मालिकेतील जोडी विरू-पियू यांचा विवाहसोहळा येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

Viru piyu marriage photos


वीरू व पियू यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून लग्नाचे अनेक फोटोज् आणि व्हिडिओज व्हायरल होताना दिसून येत आहेत. भांडणापासून सुरू झालेल्या दोघांच्या नात्याचे नंतर नकळत प्रेमात रूपांतर झालेले मालिकेत दाखविण्यात आले. मैत्री पासून ते लग्नापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना खूपच आवडला.

Viru piyu marriage photos

“बोललो तर बोललो” अशी टॅगलाईन घेऊन सुरू झालेल्या मालिकेत आता वीरुला प्रेम मिळविण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागला होता. पियूचे वडील अंकुश राव पाटील यांनी वीरुला बेदम मारहाण देखील केली होती. तरीही हे दोघे ठाम राहून लग्नासाठी सज्ज झाले आहेत.

 

एका प्रोमो नुसार लग्न सोहळ्यात अंकुशराव पाटील येऊन लग्न मोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु कांचन काकी दोघांच्या बाजूने उभी राहिलेली दिसून आली आहे. विरू व पियु दोघेही लग्नातील पेहरावात खूपच सुंदर दिसून येत आहेत. हा लग्नसोहळा सोमवार दिनांक 1 मार्च 2021 पासून पाहायला मिळणार आहे.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *