भारताचा लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली व बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीला 11 जानेवारी रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते. या दोघांच्या फॅन्स साठी ही एक मोठी आनंदाची बातमी होती. बाळाच्या स्वागतासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा क्रिकेट दौरा अर्ध्यावर सोडून आलेल्या विराट ने स्वतः सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेयर केली होती.

Virushka baby name


त्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर विराट व अनुष्का मीडियासमोर आले होते. त्यावेळी दोघे त्यांच्या मुलीला चेकअप साठी घेऊन गेले होते. त्यावेळी मीडियाने दूर वरूनच दोघांच्या फोटो देखील घेतल्या होत्या. परंतु या दोघांनी आजपर्यंत बाळाची एक देखील फोटो प्रसारित केली नव्हती.

Virushka baby name

आज अनुष्का ने स्वतः तिघांचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला. या फोटो मध्ये अनुष्का तिच्या मुलीला हातात घेतलेले दिसून येत असून विराट देखील सोबतच आहे. या फोटो मध्ये देखील त्यांनी मुलीचा चेहरा दाखविला नाही. परंतु अनुष्काने चिमुकलीचे नाव मात्र घोषित केले आहे.

Virushka baby name

“आम्ही प्रेमाने जीवन जगत आलो, परंतु, या छोट्या ‘वामिका’मुळे याला वेगळीच उंचीवर नेऊन सोडले आहे. अश्रू, हास्य, आनंद, काळजी कधी कधी या गोष्टी काही मिनिटातच अनुभवता येतात. आमची झोप उडाली आहे, परंतु आमचे हृदय भरून आले आहे.” असे म्हणत अनुष्काने सर्वांचे आभार मानले व मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवल्याचे सांगितले.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.