झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिकेला जगभरातील मराठी प्रेक्षकांकडून प्रेम मिळालेले पाहायला मिळत असते. काही मालिका जास्त काळ टिकून राहतात व तर काही मालिका लवकरच निरोप घेताना दिसतात. आता झी मराठीची आणखीन एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला मालिकेने निरोप घेतला होता. नवीन मालिका आल्यापासून झी मराठीच्या मालिकांचा टीआरपी वाढत चालला आहे. आता झी मराठीची लाडाची मी लेक ग ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे. ही मालिका लवकरच संपणार असल्याने अनेक प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जरी ही मालिका लवकरच संपत असली तरी आता मराठी मधील चॉकलेट हिरो शशांक केतकर नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांक केतकर याची नवीन मालिका 1 मार्च पासून संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. या मालिकेचे नाव “पाहिले न मी तुला” हे असणार आहे.
“पाहिले न मी तुला” या मालिकेत आशय कुलकर्णी हा मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार असून तो सध्या माझा होशील ना मालिकेत सुयशची भूमिका साकारत आहे. तसेच या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत नवोदित अभिनेत्री तन्वी मुंडळे दिसणार आहे. या मालिकेला निर्माते हे महेश व आदिनाथ कोठारे यांचे कोठारे व्हिजन असतील.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका