अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री अर्चना लोखंडे नेहमी चर्चेत राहत आहे. गेल्या काही महिन्यात तिने दिलेल्या मुलाखतीत अंकिताने तिच्या व सुशांतच्या नात्याबद्दल तसेच, तिच्या करियर बद्दल महत्वाचे खुलासे केले आहेत. अंकिता लोखंडे हीने आता परत एकदा एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंकिताला देखील कास्टिंग काउचचा सामना करावा लागला सांगितले आहे. हा प्रकार घडला त्यावेळी अंकिता फक्त 19 वर्षाची होती. एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या ऑडिशन साठी अंकिताला बोलाविण्यात आले होते. परंतु तिथे अंकीताला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.
S
अंकिता म्हणाली, “मी तिथे गेल्यास एका माणसाने मला खोलीत नेऊन विचारलं, तुला कॉम्प्रमाईज करावे लागेल. मला समजले होते तरी मी त्याला विचारलं, कोणते कॉम्प्रोमाइज करावे लागेल. निर्मात्याला नक्की काय पाहिजे माझ्याकडुन? मी लहान असून देखील त्यांना बजावत म्हटले, तुम्हाला हुशार अभिनेत्री नको तर झोपणारी मुलगी पाहिजे.”
त्यानंतर त्यांनी अंकिताची माफी मागितली व काम देण्याचे आश्वासन देखील दिले होते. सध्या त्या अभिनेत्याला सर्वजण चांगलेच ओळखतात.परंतु, अंकिताने ती ऑफर नाकारली होती. पुढे बोलताना अंकिताने एका नावाजलेल्या अभिनेत्याने तिच्या सोबत गैरवर्तन केल्याचे देखील म्हटले. परंतु, तिने त्या अभिनेत्याचे नाव सांगण्यास नकार दिला. अंकिताच्या या धक्कादायक खुलास्यानंतर परत एकदा MeToo प्रकरणाने तोंड वर काढले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.