मागील काही महिन्यांपासून अनेक भारतीय सेलिब्रिटींच्या घरात बाळाच्या आगमनाच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. विराट-अनुष्का, बबिता फोगाट, हार्दिक पांड्या-नताशा, करीना-सैफ यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले. आता बॉलिवुडच्या 2 लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल व निती मोहन या गरोदर असल्याचे उघड झाले आहे.

Bollywood actress pregnancy news


आपल्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेया घोषाल हीने स्वतः पोस्ट करून फॅन्सला ही आनंदाची बातमी सांगितली. 2000 मध्ये गाण्याच्या शो ची विजेती ठरलेल्या श्रेया ने शेकडो गाणी दिली. तिने आजवर प्रत्येक भाषेत गाणी गाताना दिसून आली आहे. 6 फेब्रुवारी 2015 रोजी तिने शिलादित्या मुखोपाध्याय या व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला होता.

 

श्रेयाने ही बातमी पोस्ट करीत असताना फॅन्स ना आशिर्वाद देण्याची विनंती केली. वयाच्या 36व्या वर्षी ही स्वरसम्राज्ञी नवीन पाहुण्याच्या आगमनासाठी सज्ज आहे. श्रेया सोबतच बॉलिवुडची गायिका नीती मोहन ही देखील गरोदर आहे. नीतीने देखील स्वतः ही गोड बातमी शेयर करीत आनंद द्विगुणित केला.

18 नोव्हेंबर 1979 रोजी जन्मलेल्या या नीती मोहनने आपल्या सुरेल गायिकीने युवा पिढीला भुरळ घातली आहे. 42 वर्षीय ही गायिका 15 फेब्रुवारी 2019 रोजी निहार पांड्या या व्यक्ती सोबत विवाह बंधनात अडकली होती. नीती व श्रेयाच्या या बातमीमुळे आता अभिनय क्षेत्राप्रमाणेच संगीत क्षेत्रातून देखील नवीन बाळाचे आगमन होताना दिसेल.

Bollywood actress pregnancy news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *