गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या कन्येला घेऊन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर सैफ करीनाच्या दुसऱ्या मुला बाबतीत पण अशीच चर्चा झाली. बाळाचा चेहरा इतक्यात न दाखवायची परंपरा मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री धनश्री काडगावकरने देखील चालू ठेवली आहे.

Dhanashri Kadgaonkar baby


धनश्री ही अगोदरप्रमाणे गरोदरपणात देखील फोटोशूट करताना दिसून येत होती. दिनांक 28 जानेवारी रोजी धनश्रीने स्वतः पोस्ट करून पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे सांगितले होते. परंतु, तिने स्वतःचे व बाळाचे फोटोज् पोस्ट केले नव्हते. परंतु, आता ती परत सोशल मीडियावर ॲक्टिव झालेली दिसून येत आहे. धनश्रीने आता पहिल्यांदा तिच्या मुलासोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Dhanashri Kadgaonkar baby

गेल्या काही महिन्यात धनश्रीने बेबी बंपसोबत अनेक फोटो काढलेले दिसून आले होते. आता धनश्री ने बाळासोबतचा एक इंस्टाग्राम रील व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ती बाळाला घेऊन नाचताना दिसून येत आहे. सोबतच धनश्रीने कॅप्शनमध्ये “संध्याकाळी 7 ते सकाळी 7 ची शिफ्ट. आणि हा अजून एक प्रयत्न होता त्याला झोपविण्याचा” असे लिहिले.

 

मुलाच्या जन्मानंतर धनश्री ने पोस्ट करताना असे लिहिले होते, “आम्ही तुम्हाला सांगायला खूप आनंदी आहोत की आज सकाळी आमच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. मी आणि बाळ एकदम ठीक आहोत. आम्हाला प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा दिल्या बद्दल सर्वांचे खूप खूप आभार.”

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *