Divya subhash biography

मराठी मालिकांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत सध्या सर्वात टॉपला “मुलगी झाली हो” ही मालिका दिसून येत आहे. स्टार प्रवाह वरील या मालिकेने नवीन आकडेवारीत टीआरपी मध्ये आघाडीला राहून नेहमीच सातत्य ठेवले आहे. या मालिकेत माऊची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

Divya subhash biography

S

“मुलगी झाली हो” मालिकेत गेल्या काही दिवसांपासून रंजक गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत विलास पाटील व सरदेशमुख यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला. हा वाद चालू असतानाच विलास पाटलांचा मुलगा रोहन हा सरदेशमुख यांना ढकलून देतो. परंतु, यात विलास पाटील हे अडकतात. परंतु त्यांची मुलगी माऊ हा आरोप स्वतःवर घेऊन वडिलांना आरोपमुक्त करते.

Divya subhash biography

मालिकेत साध्या पेहरावात दिसणारी व मुक्या महिलेचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव आहे दिव्या सुभाष पुगावकर. दिव्या मालिकेत जरी साध्या पेहरावात दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच मॉडर्न दिसते. दिव्याचा जन्म 26 जुलै 1996 रोजी झाला होता. मुंबईत वास्तव्यास असलेल्या दिव्याला अभिनया सोबतच मॉडेलिंगची पण खूप आवड होती.

Divya subhash biography

दिव्याने मुलगी झाली हो मालिकेत येण्यापूर्वी स्टार प्रवाहच्या “प्रेम तुझा रंग कसा” या मालिकेतून पदार्पण केले होते. परंतु, नंतर ती विठू माऊली मालिकेत “चंद्रभागा” हे पात्र साकारताना दिसून आली होती. परंतु, दिव्याला खरी ओळख “मुलगी झाली हो” मालिकेतील “माऊ”च्या रोल मुळेच मिळाली, हे नक्की. अशा या गुणवान अभिनेत्रीला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *