2 दिवसापूर्वी मुंबईच्या घाटकोपर परिसरात एक खूप भयंकर घटना घडलेली पाहायला मिळाली. कारभारी लयभारी, युवा डान्सिंग क्वीन या शो मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री गंगा हीच्या सोबत धक्कादायक प्रकार घडला होता. त्याच वेळी तिने लाईव्ह द्वारे घाबरलेल्या अवस्थेत मदत मागितली. आता तिने संपूर्ण प्रसंग शेयर केला.


गंगा ही तृतीयपंथी असून तिचे खरे नाव प्रणित हाटे आहे. गंगाने “लोकमत”ला दिलेल्या मुलाखतीत ती घटना सांगताना म्हटली, “मी घाटकोपरमध्ये एका बस स्थानकावर बसची वाट पाहत बसले होते. तितक्यात एक तृतीयपंथी तिथे आली आणि ती माझ्या जवळ येऊन बसली. ती पूर्णतः नशेत होती. मला तिने विचारले, तू तृतीयपंथी आहेस तर हे केस का वाढविले.”

Karbhari laybhari latest news

यावर गंगाने उत्तर दिले, “मी कसे राहायचं हे तू कसे ठरवू शकते. तिला याचा राग आला व तिने माझे केस पकडले. मला व माझ्या मित्राला तिने खूप घाणेरड्या पद्धतीने मारले आणि घाण घाण शिव्या दिल्या. नंतर ती स्वतःचे कपडे काढत होती व माझे पण कपडे काढू लागली. तिने जवळ जवळ माझी पॅन्ट खाली खेचलीच होती.”

“रात्रीचे 10.30 वाजले होते. त्यामुळे तिथे खूप लोक होते. तरीही कोणीही मदतीला आले नाही. मी धावत जाऊन रिक्षात बसले. रात्री 2 वाजता मुंबई कमिशनरच्या ऑफिस मधून कॉल आला. नंतर त्यांनी ती केस पंतनगर पोलीस स्टेशन कडे सुपूर्त केली. दुर्दैवाने मारहाण केलेली ती व्यक्ती आणखीन पकडली गेली नाही.” असे गंगाने आपली दुःखद घटना सांगितली.

Karbhari laybhari latest news
माहिती शेअर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *