एखाद्या गाण्याबद्दल इतकी चर्चा होवू जाते की त्या गाण्यावर स्वतःचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ट्रेण्ड बनून जातो. तामिळ भाषेतील “मास्टर” चित्रपटामधील “वाथी कमिंग” हे गाणे इतके प्रचंड व्हायरल झाले आहे की त्या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी डान्सचे व्हिडिओ बनविले. साऊथ सुपरस्टार विजयचे हे गाणे असल्यानेच ते इतके फेमस झाले.

Latika viral dance


वाथी कमिंग या गाण्यावर यापूर्वी अनेक मराठी कलाकार थिरकताना दिसून आले. आता “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेतील अभिनेत्रीने देखील यावर डान्स केलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे. मालिकेत लतिकाची भूमिका साकारणाऱ्या अक्षया नाईक या अभिनेत्रीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षयाने यापूर्वीही काही डान्स व्हिडिओ पोस्ट केले होते.

मालिकेत अक्षयाला तिच्या जाडपणामुळे अनेक मुलांकडून लग्नासाठी नकार मिळालेले दाखविण्यात आले होते. मालिकेचा नायक अभ्यामुळे लतिकाचे ठरलेले लग्न मोडले व त्यामुळे नाईलाजाने तिचे लग्न अभ्यासोबत करण्यात आले. पसंती विरूद्ध लग्न झाले असले तरी लतिकाच्या स्वभावामुळे अभ्याला तिच्या प्रेमात पडलेले दाखविण्यात आले.

Latika viral dance

लतिकाच्या वाढदिवशी अभ्या लतिका समोर आपले प्रेम व्यक्त करणार असतो. परंतु, दौलत आणि त्याची माणसे अभ्याला बेदम मारहाण करतात व त्यामुळे अभ्या सध्या दवाखान्यात गंभीर अवस्थेत असल्याचे दाखविले आहे. सध्या मालिकेत जरी गंभीर परिस्तिथी दाखविण्यात येत असली तरी ऑफ स्क्रीन अक्षया मात्र हैदोस नाचताना दिसून येत आहे. तिच्या या डान्स व्हिडिओचे अनेकांनी कौतुक देखील केले आहे.

Latika viral dance

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *