झी मराठी वाहिनीवरील जास्त काळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजेच “तुझ्यात जीव रंगला” ही होय. राणा अंजली प्रमाणेच या मालिकेतील खलनायिका नंदिता प्रेक्षकांना खूपच आवडली. मालिकेच्या शेवटी धनश्री काडगावकरची जागा घेणाऱ्या माधुरी पवारला देखील फॅन्सनी तितकीच पसंती दिली होती.

Madhuri pawar


माधुरी पवारचा जन्म सातारा शहरात झाला असून तिचा जन्म 21 मार्च, 1993 रोजी झाला होता. तिने महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले असून तिने एमबीएची पदवी देखील घेतली आहे. अगोदर पासूनच अभिनय व डान्सची आवड असलेल्या माधुरीला टिकटॉकमुळे अधिक लोकप्रियता मिळाली होती.

 

सोशल मीडियावर माधुरी सारखे ॲक्टिव क्वचितच एखादी अभिनेत्री राहत असेल. तिचे अनेक डान्स व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या डान्स व्हिडिओमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते. तिच्या मॉडर्न लुक मधील काही व्हिडिओज व फोटोजनी तर युवा पिढीवर भुरळ घातली आहे.

 

मालिकेत नेहमीच साडीवर दिसणाऱ्या माधुरीच्या या बोल्ड डान्सला पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. याच कारणाने माधुरी सध्या अनेक इव्हेंट साठी अनेकांची पसंती ठरत आहे. माधुरीने या अगोदरही टेलिव्हिजन वर झी युवा वरील अप्सरा आली या डान्स शो डान्स चे जलवे दाखवून विजेती झाली होती.

Madhuri pawar

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *