झी मराठीवरील आजपर्यंतच्या लोकप्रिय मालिकेपैकी 1 असणाऱ्या “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेने जगभरातून प्रसिद्धी मिळवली. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांची नावे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना पाठ झाली होती. याच प्रेमामुळे या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले होते.

Mazya Navaryachi bayko latest news


माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत नेहमीच काही ना काही बदल करण्यात येत गेले व त्याच बदलांमुळे प्रेक्षकांना नेहमीच नवीन काहीतरी पहावयास मिळत गेले. परंतु, शेवटी शेवटी ही मालिका प्रेक्षकांना कंटाळवाणी वाटू लागली होती. त्याचाच परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला व मालिकेची वेळ देखील बदलण्यात आली.

Mazya Navaryachi bayko latest news

आता इतके चढ उतार पाहिल्यानंतर मालिकेचा आज शेवटचा एपिसोड पाहायला मिळणार आहे. तब्बल साडे 4 वर्ष आणि 1375 एपिसोड पूर्ण केल्यानंतर शेवटी मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे. शेवटच्या भागात गुरुनाथला राधिका, शनया व माया तिघीही शिक्षा देताना दिसतील. परंतु शेवटच्या क्षणी गुरुनाथ लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे हीच्या सोबत लग्न करणार असल्याचे प्रोमो मधून दिसून येत आहे.

 

 

राधा ही बावरी, जागो मोहन प्यारे या मालिकेतून अगोदरच झी मराठीवर झळकलेली अभिनेत्री श्रुती मराठे ही काही क्षणासाठी परत एकदा झी मराठीवर दिसणार आहे. श्रुती व अभिजित(गुरूनाथ) हे खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत. पण मालिकेत खरेच श्रुती मराठे ही गुरूची शेवटची बायको असेल का हे शेवटच्या भागात कळेलच.

Mazya Navaryachi bayko latest news

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *