झी मराठी वाहिनीवर सध्या प्रेक्षकांना काही नवीन मालिका पाहायला मिळत आहेत. 1 मार्च 2021 रोजी सुरू झालेल्या “पाहिले न मी तुला” या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळत आहेत. मनु व अनिकेतची प्रेमकहाणी आणि शशांक केतकरची खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना आवडताना दिसून येत आहे.
S
“पाहिले न मी तुला” या मालिकेत महत्त्वाचा भाग असणाऱ्या एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसून येत आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे मंजुषा खेत्री. यापूर्वी “लागीर झालं जी” या मालिकेत मालिकेत निलम काकीचे पात्र साकारणारी मंजुषा आता नवीन मालिकेत देखील नीलम हेच पात्र साकारताना दिसत आहे. परंतु यावेळी ती एका मॉडर्न लुक मध्ये दिसून येत आहे.
मंजुषाने ब्युटी काँटेस्ट पासून आपल्या करियरची सुरुवात करताना कोकण विभागातील अनेक स्पर्धेत विजेती ठरली होती. मिस पश्चिम टाईम्स, मिस रत्नागिरी, मिस कोंकण, मिस साऊथ महाराष्ट्र अशा अनेक स्पर्धेत आपल्या सौंदर्याची छाप पाडत मंजुषा विजेती ठरली. यातूनच आत्मविश्वास मिळवत तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
मंजुषाचा जन्म रत्नागिरी येथे झाला असून, ती गेल्या 10 वर्षापासून कोल्हापूर येथेच राहते. मंजुषा ही सोशल मीडियावर अगोदरपासूनच खूप ॲक्टिव दिसून येते. तिच्या बोल्ड लुकची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसून येते. सध्या ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत नीलम समरला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका