झी मराठी वाहिनी सध्या नवनवीन मालिकांची मेजवानी प्रेक्षकांसमोर मांडताना दिसून येत आहे. चॅनेलचा उतरलेला टीआरपी पाहता इतके बदल करणे साहजिक होते. त्यामुळे “उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा” असे शीर्षक घेऊन आज पासून “पाहिले न मी तुला” ही नवीन मालिका आजपासून सुरू होत आहे.

Pahile n mi tula serial news on tanvi


पाहिले न मी तुला या मालिकेत लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर सोबतच आशय कुलकर्णी, तन्वी मुंडले हे मुख्य कलाकार दिसणार आहेत. शशांक हा नकारात्मक भूमिकेत दिसणार असून तो अभिनेता आशय व अभिनेत्री तन्वी यांच्या प्रेमात अडथळा निर्माण करताना पाहायला मिळेल. सोबतच या मालिकेत लागिर झालं जी मालिकेतील “मंजुषा खेत्री” ही अभिनेत्री दिसणार आहे.

Pahile n mi tula serial news on tanvi

लागिर झालं जी या मालिकेत मंजुषा खेत्री यांनी शितलीच्या काकूची भूमिका साकारली होती. कायम शितलीची बाजू घेणाऱ्या नीलम काकीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. आता हीच नीलम काकी परत एकदा नवीन मालिकेतून दिसणार आहे. या मालिकेत देखील त्यांचे नाव नीलम हेच असणार आहे.

Pahile n mi tula serial news on tanvi

पाहिले न मी तुला या मालिकेत मंजुषाची काय भूमिका असेल हे लवकर कळेलच. परंतु, मालिकेच्या काही प्रोमोवरून तरी मालिका चांगल्या दर्जाची वाटत आहे. कोठारे व्हिजन निर्मित या मालिकेला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *