Pooja savant saves

जगभरात लाखोच्या संख्येने जीवसृष्टी वास्तव्यास असते. सर्व सजीव प्राणी व पक्षी यांना जीवन जगण्यासाठी चारा पाणी लागतच असते. मनुष्य जात जसे अन्न पानी मिळविण्यासाठी कष्ट करताना दिसतो, तसेच कष्ट अन्य जीवसृष्टी देखील करीत असते. परंतु, उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाणी न मिळाल्या अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे ऐकायला मिळते.

Pooja savant saves bird

सध्या मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सोबत ने एका घुबडाला जीवनदान दिल्याची बातमी समोर आली आहे. एक घुबड पाण्यात पडले असल्याचा पूजा सावंतच्या टीमला कॉल गेला. पूजा सावंत ही त्या ठिकाणी पोहचे पर्यंत तेथील लोकांनी त्याला पाण्याबाहेर काढले होते. परंतु ते घुबड गंभीर अवस्थेत होते.

Pooja savant saves bird

त्यावेळी पूजा ने स्वतः जवळ असलेली काही औषधांनी त्या घुबडाचा उपचार केला. नंतर पूजा ने त्या घुबडाला तिची मैत्रिणी डॉ. दिपा कट्याल यांच्या कडे नेले. तिथे त्या घुबडाचे योग्य ते उपचार करण्यात आले. दुसऱ्या दिवसापासूनच त्या घुबडामध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. जेंव्हा ते घुबड व्यवस्थित उडू शकते, असे कळल्यास पूजा व दिपा यांनी त्या घुबडाला मोकळ्या हवेत सोडून दिले.

 

सध्या उन्हाळा चालू असल्याने ते घुबड पाण्याच्या शोधात आले होते व त्यामुळेच ते एका पाण्याच्या टाकीत पडले होते. पूजा ने केलेल्या या कार्याची सर्वच स्तरातून वाहवाही होत आहे. तिने असे कार्य यापूर्वीही बऱ्याचदा केलेले दिसून आले. परंतु, ज्या घुबडाचे तोंड पण पाहायला काही लोक घाबरतात अशा पक्ष्याला जीवनदान देऊन पुजाने मोठे पुण्याचे काम केले आहे, हे नक्की.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *