Ratri khel chale new actress

झी मराठी वाहिनीने सध्या प्रेक्षकांच्या मागणीनुसार मोठे फेर बदल केलेले दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. यात सर्वात जास्त आतुरता असलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेचे तीसरे सिझन देखील नुकतेच सुरू झाले आहे.

Ratri khel chale new actress


रात्रीस खेळ चाले-३ या मालिकेत आणखीन कोणत्याही अभिनेत्रीला दाखविण्यात आले नव्हते. परंतु, आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो आला असून त्यात पौर्णिमा डे ही अभिनेत्री दिसून येत आहे. तुला पाहते रे मालिकेत सौन्याची भूमिका साकारली होती. पौर्णिमा डे आता त्या मालिकेप्रमाणेच रात्रीस खेळ चाले मध्ये देखील नकारात्मक भूमिकेत दिसणार, असेच प्रोमो मधून वाटत आहे.

Ratri khel chale new actress

 

प्रोमो नुसार पौर्णिमा माईकडून जबरदस्तीने वाडा मिळवायला दिसून येत आहे. परंतु, तितक्यात माईचा मुलगा अभिराम तिथे आलेला दिसून येत आहे. या मालिकेत शेवंताचे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार का हा प्रश्न सर्वच फॅन्सना पडला होता. परंतु, याबाबतीत सत्य माहिती समोर आली आहे.

आपल्या अदांनी रात्रीस खेळ चाले-२ सीझन गाजवणारी अपूर्वा नेमळेकर ही देखील मालिकेत दिसून येणार आहे. येत्या काही भागात अपूर्वा प्रेक्षकांना दिसणार असल्याचे समजते. परंतु, यावेळी मालिकेत खूप वेगळेपणा पाहायला मिळणार आहे. याची एक झलक पहिल्या भागापासुनच फॅन्सना पहावयास मिळाली आहे. त्यामुळे यावर्षी देखील मालिका हिट होण्याची शक्यता आहे.

Ratri khel chale new actress

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *