संपूर्ण देशाची लोकप्रिय जोडी रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसून येत असते. कोणताही प्रसंग असला तरी हे दोघे व्हिडिओ द्वारे किंव्हा फोटो द्वारे व्यक्त होताना दिसतात. तसेच, हे दोघांची किती परिपूर्ण जोडी आहे, याचा प्रत्यय हे दोघे नेहमीच देत असतात. त्यामुळे या दोघांच्या प्रत्येक पोस्ट चर्चेचा विषय ठरत असतात.

रितेश व जेनेलिया या दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलं. त्यात हे दोघे नेहमीच काही तरी कॉमेडी करून फॅन्सना हसविण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्या जेनेलियाने पोस्ट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 1 वर्षापूर्वी आयफा अवार्ड सोहळ्या दरम्यानचा एका व्हिडिओ संदर्भात जेनेलियाने हा व्हिडिओ बनविला आहे.
आयफा अवार्ड सोहळ्या दरम्यान रितेशची भेट अभिनेत्री प्रीती झिंटा सोबत झाली. त्यावेळी रितेश व प्रितीच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की त्या दोघांनी जेनेलियाला पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. तसेच, रितेशने प्रितीच्या हातावर किस केली व मिठी देखील मारली. यावेळी जेनेलियाच्या चेहऱ्याचे हावभाव कॅमेरात कैद झाले.
या व्हिडिओ नंतर घरी काय झाले होते, असे सांगत जेनेलियाने एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात जेनेलिया रितेशला मारताना दिसली व रितेश माफी मागताना दिसून आला. हा व्हिडिओ पाहून अनेक सेलिब्रिटींना हसू आवरता आले नाही. स्वतः प्रीतीने झिंटा ने देखील हाच व्हिडिओ पोस्ट करून हे खूप हास्यास्पद असल्याचे म्हटले.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका