गेल्या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींनी आत्महत्या केल्याच्या घटना ऐकावयास मिळाल्या. आता परत एकदा लोकप्रिय कुस्तीपटू बबीता फोगाट हिच्या बहिणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बबिता फोगट हिची मामेबहीण रितिका फोगट हिने15 मार्च 2021 रोजी गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली होती.

Ritika fogat death reason

 

रितिकाच्या आत्महत्येनंतर क्रीडा क्षेत्रात तसेच देशभरातून व्यक्त करण्यात येत होते. परंतु केवळ सतरा वर्षाची असणाऱ्या रितिकाने नेमके कोणत्या कारणाने जीवन यात्रा संपवली हाच प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु, आता रितिकाच्या आत्महत्येचे खरे कारण समोर आले आहे. आत्महत्येच्या एक दिवस अगोदर रीतिकाने राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता.

Ritika fogat death reason

कुस्ती स्पर्धा खेळण्यासाठी रितिका ही बबिता फोगट यांच्या हरियाणा येथील घरी राहावयास आली होती. अंतिम सामन्यात रीतिकाला फक्त 1 पॉईंटने हारचा सामना करावा लागला होता. हे अपयश रितिका पचवू न शकल्याने तिने आत्महत्या केल्याचे समजते. यावेळी बबिताचे आई वडील घरीच होते. परंतु, तिने बंद खोलीत हे दुर्दैवी पाऊल उचलले.

Ritika fogat death reason


दुसरीकडे ज्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एका पॉइंट ने रितिका हरली, त्या सामन्याची चौकशी करण्याचे देखील आदेश देण्यात आल्याचे समजते. रितिकाच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना गीता फोगट ने म्हटले, “देवा माझ्या छोटी बहिणीला, माझ्या मामाच्या मुलीला शांती मिळू दे. माझ्या परिवारासाठी ही खूप दुःखद घटना आहे. रितिकाने असे का पाऊल उचलले माहिती नाही. हार-जीत खेळाडूंच्या जीवनाचा भाग आहे, यामुळे असे पाऊल उचलायला नाही पाहिजे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *