मराठी मालिकांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत सध्या सर्वात टॉपला “मुलगी झाली हो” ही मालिका दिसून येत आहे. स्टार प्रवाह वरील या मालिकेने टीआरपी मध्ये आघाडीला राहून नेहमीच सातत्य ठेवले आहे. सध्या मालिकेत रंजक गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत.

Siddharth Khirid and mau dance


काही दिवसांपूर्वी मालिकेत विलास पाटील व सरदेशमुख यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला. हा वाद चालू असतानाच विलास पाटलांचा मुलगा रोहन हा सरदेशमुख यांना ढकलून देतो. परंतु, यात विलास पाटील हे अडकतात. परंतु त्यांची मुलगी माऊ हा आरोप स्वतःवर घेऊन वडिलांना आरोपमुक्त करते.

 

या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी व खऱ्या आरोपीला पकडण्यासाठी मालिकेत सिद्धार्थ खिरीद या अभिनेत्याची एन्ट्री झालेली दाखविण्यात आली. सिद्धार्थने एसीपी सिद्धांत भोसलेचे पात्र अतिशय उत्तमरीत्या साकारलेले दिसून येत आहे. सिद्धांत ने नंतर आरोपी रोहनला जेरबंद करून माऊची जेलमधून मुक्तता केली.

सिद्धार्थ खिरिद ने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूपच पसंद पडलेली दिसून येत आहे. सिद्धार्थ ने जाडूबाई जोरात, एक होती राजकन्या, फ्रेशर्स अशा अनेक मालिकेतून यापूर्वीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. “मुलगी झाली हो” मालिकेतील माऊ म्हणजेच दिव्या सुभाष सोबतचा सिद्धार्थचा “एक नारळ दिलाय” गाण्यावर केलेला एक डान्स व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *