सध्याच्या युगात लहान लेकरांची शारीरिक वाढ हवी तशी वाढताना दिसून येत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजेच लेकरांच्या खेळण्याच्या वयात शैक्षणिक अभ्यासाचे ओझे हे होय. अशातच आता चिमुकले बोलायला- चालायला शिकत नाहीत, तोपर्यंतच लहान मुलांना शाळेत पाठवीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Small cute girl video


आधुनिक जगात सध्या सर्वत्र इंग्रजी शाळांचा प्रसार झालेला पाहायला मिळत आहे. परंतु हा प्रसार इतका वाढला आहे की मुलांच्या मेंदूवर अभ्यासाचे ओझे वाटू लागले आहे. कारण वयाच्या मानाने जास्त क्षमतेचा अभ्यासक्रम त्यांच्यावर लादण्यात येत आहे. याच संबंधी आता एका लहान मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

 

हा व्हिडिओ एका पूर्व प्राथमिक इंग्लिश शाळेतील वाटत असून त्यात गोड लहान मुलगी रडताना दिसून येत आहे. तपस्या नामक त्या गोड चिमुकलीला शिक्षिका इंग्रजी मध्ये बोलताना दिसून येत आहे. मला आई पाहिजे, मला घरी जायचंय असे म्हणत ती चिमुकली रडू लागली.

Small cute girl video

दहा-पंधरा वर्षांपूर्वी इंग्लिश मीडियम शाळांचे अस्तित्व नव्हते. त्यामुळे पालकांच्या खिशावर व चिमुकल्यांच्या मेंदूवर ओझे फार कमी होते. तसेच, पूर्वी शाळांची संख्या कमी असल्याने जवळची सर्वच मुले एकाच शाळेत जात असे. आता व्यवसायाप्रमाणे प्रत्येक भागात इंग्रजी शाळा दिसून येतात. परंतु, बाळाच्या बौद्धिक वाढी सोबतच शारीरिक वाढीकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असते.

माहिती कशी वाटले ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *