.आज रंगपंचमी असल्याने महाराष्ट्रातील अनेक भागात रंगाची उधळण झालेली पाहायला मिळाली. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील होळी ही घरातील सदस्यांसोबतच खेळण्याचे शासनाचे आदेश होते. सर्व सेलिब्रिटींनी यावर्षी परिवारासोबत होळी साजरा केली. परंतु, एका अभिनेत्रीने एक धक्कादायक प्रसंग शेयर केला आहे.

Sofiya on holi

S

लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस सीझन 7 मधील वादग्रस्त स्पर्धक सोफिया हयात हीने 5 वर्षापूर्वी घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली आहे. सोफिया ने म्हटले “2016 या वर्षी बॉलिवुड मधील अनेक नामवंत सेलेब्रिटी होळी खेळण्यासाठी एकत्र जमले होते. या पार्टी मध्ये काही सर्वसामान्य लोक पण उपस्थित होते.”

Sofiya on holi

“अनेकजण माझ्या सोबत फोटो काढण्यासाठी जवळ येत होते. मी पण सर्वांसोबत आनंदाने होळी साजरी करीत होते. तेंव्हा एक व्यक्ती फोटो काढण्याच्या बहाणे माझ्या जवळ आला आणि त्याने जवळपास त्याचा हात पूर्णतः माझ्या स्कर्ट मध्ये घातला होता. मी भांगेच्या नशेत असल्याने प्रतिकार करू शकले नव्हते व त्याची हिम्मत आणखीनच वाढली. मला त्याने उचलून घेण्याचा प्रयत्न केला होता”, असे पुढे सोफिया म्हणाली.

Sofiya on holi

पुढे सोफिया म्हणाली, “मला त्यावेळी एका पत्रकार मित्राने वाचविले होते व हा सर्व प्रकार मला नशा उतरल्यास समजला. तेंव्हापासून मी फक्त माझ्या जवळच्या व्यक्तींसोबतच होळी खेळत असते.” सोफियाला बिग बॉस नंतर बिग बॉस नंतर अभिनय क्षेत्रात जास्त काम मिळाले नाही. परंतु, ते नेहमीच वादग्रस्त पोस्ट करताना दिसून येत असते.

Sofiya on holi

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *