गेल्या काही महिन्यांपासून कला क्षेत्रातून अनेक धक्कादायक घटना ऐकायला मिळत आहेत. आता मराठी अभिनय क्षेत्रातील एका अभिनेत्यासोबत अशीच घटना घडलेली ऐकायला मिळत आहेत. अभिनेता सुयश टिळक हा ज्या गाडीतून जात होता त्या गाडीचा मोठा अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली.

Suyash accident news


रविवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पहाटे सुयश हा स्वतःच्या गाडीने न जाता कॅबने प्रवास करीत होता. परंतु, अंधारात मालवाहतूक करणाऱ्या गाडीने सुयश बसलेल्या कॅबला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की कॅब रस्त्याच्या कडेला पलटून पडली होती. आत ड्रायव्हर व सुयश दोघेच होते.

Suyash accident news

इतका मोठा अपघात होवून देखील सुयशचे नशीब बलवत्तर होते, असेच म्हणावे लागेल. दोघांनाही कसली गंभीर दुखापत झाली नाही. सुयश स्वतः कॅबबाहेर तर आलाच पण त्याने ड्रायव्हरला देखील बाहेर काढून मनाचा मोठेपणा दाखविला. या दुर्घटनेत गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. एक प्रकारे सुयशचा पुनर्जन्मच झाला आहे.

Suyash accident news

सुयशच्या अपघाताची माहिती फॅन्स पर्यंत वाऱ्यासारखी पसरली. सर्वजण चिंतेत असलेले पाहून सुयशने स्वतः पोस्ट करून सुखरूप असल्याचे सांगितले. “देव दयाळू आहे व जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे.” असे पोस्ट करीत सुयशने काळजी करणाऱ्याचे धन्यवाद मानले.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *