काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची लोकप्रिय जोडी सैफ अली खान व करीना कपूर यांच्या घरी बाळाचे आगमन झाले होते. तेंव्हा पासून ही जोडी सोशल मीडियावर जास्तच चर्चेत होती. दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर करीना बरेच दिवस मीडियासमोर आली नव्हती.

Taimur fall video


तब्बल 20 दिवसानंतर करीना व तिचा पहिला मुलगा तैमूर प्रथमच मीडियासमोर दिसून आले. तैमूर सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरतच असतो. त्याच्यावर सोशल मीडियावर रोज हजारो मीम्स बनविले जातात. आताही तैमूर सोबत घडलेली एक घटना मिडिया वाल्यांनी कॅमेरात कैद केली.

Taimur fall video

काल दिनांक 11 मार्च रोजी करिश्मा कपूरची मुलगी समायरा हीचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने करीना व तैमूर वाढदिवस साजरा करण्यासाठी करिष्माच्या घरी गेले. तिथे गाडीतून उतरल्यानंतर करिष्मा मीडिया वाल्यांना पोज देत उभी राहिली. तितक्यात मागून तैमूर खाली उतरला आणि सरळच धावत निघाला.

 

धावताना तैमूरला समोरचा काच दिसला नाही आणि सरळ तो काचेला जाऊन धडकला. नंतर करीनाने त्याला ओढले व आत घेऊन गेले. परंतु, यात तैमूरला कसलीही दुखापत झाली नाही. त्यानंतर कपूर परिवाराने नातेवाईकांसोबत वाढदिवस साजरा केला.

Taimur fall video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *