झी मराठी वाहिनी सध्या नवीन “उत्सव नात्याचा, नव्या कथांचा” या टॅगलाईनला घेऊन काही नवीन मालिका प्रेक्षकांसमोर घेऊन येताना दिसून येत आहे. पाहिले न मी तुला, अग्गबाई सुनबाई, रात्रीस खेळ चाले-३ अशा काही नवीन मालिकांची मेजवानी फॅन्सना मिळत आहे. परंतु, अग्गबाई सासूबाई मालिकेतून तेजश्री प्रधान ने निरोप घेतल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Tejashree pradhan new video

S

अग्गबाई सासूबाई मालिकेला मोठे बदल करीत मालिकेच्या नावासहित मुख्य पात्र तेजश्री प्रधान व आशुतोष पत्की यांना बदलण्यात आले. मालिकेच्या व तेजश्री प्रधानचे फॅन्स तेजश्री ने मालिका का सोडली असे प्रश्न विचारीत होते. जूनी मालिका संपल्यानंतर तेजश्रीचा हा व्हिडिओ समोर येत आहे.

सध्या सुरू असलेल्या अग्गबाई सूनबाई या नवीन मालिकेत शुभ्राची भूमिका उमा पेंढारकर ही साकारताना दिसून येत आहे. या मालिकेत उमा एका बाळाच्या आईच्या भूमिकेत दिसून येत आहे. नवीन शुभ्रा ही आईच्या भूमिकेत दिसत असल्यानेच तेजश्री ने मालिकेतून निरोप घेतला असावा.

Tejashree pradhan new video

 

तेजश्रीच्या जाण्याने मालिका किती प्रसिध्दी मिळविणार हे येणारा काळच सांगू शकेल. कारण, तेजश्रीने साकारलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. अग्गबाई सूनबाई मालिकेची सुरुवात देखील चांगली झालेली पाहायला मिळत आहे. नवीन शुभ्रा, सोहम व आसावरीत झालेला बदल यामुळे मालिका प्रेक्षकांना नव्या रूपात पाहायला मिळत आहे.

Tejashree pradhan new video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *