गेली अनेक वर्ष मराठी मालिकांमध्ये झी मराठी वाहिनीच्या मालिकांचा नेहमीच दबदबा राहिला होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून झी मराठी वाहिनीच्या मालिकांना प्रेक्षकांकडून नापसंती मिळालेली दिसून येत आहे. 2021 च्या दहाव्या आठवड्यातील टीआरपी रेटिंग मध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी प्रसारक प्रेक्षक संशोधन परिषदेने(BRAC) दिली आहे.

Top marathi serial list


BRAC ने दिलेल्या माहिती नुसार या आकडेवारीत स्टार प्रवाह वाहिनीने वर्चस्व मिळविले आहे. तसेच, टॉप 5 मध्ये झी मराठीच्या एकाही मालिकेने स्थान मिळविले नाही. या आकडेवारीत 5 व्या क्रमांकांवर “सांग तू आहेस का” ही मालिका आहे. सिद्धार्थ चांदेकर व शिवानी रांगोळे हे कलाकार असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांना छान प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

Top marathi serial list

Top marathi serial list

ही आकडेवारी 6 मार्च 2021 ते 12 मार्च 2021 यातील असून त्यामध्ये चौथ्या क्रमांकावर फुलाला सुगंध मातीचा ही मालिकेने स्थान मिळविले आहे. शुभम व कीर्ती यांच्या प्रेमळ नात्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्याचे दिसते. याच यादीत तिसरा क्रमांक “रंग माझा वेगळा” या मालिकेने मिळविला आहे. कार्तिक व दिपाच्या लग्नानंतरचे आयुष्य सध्या मालिकेतून दाखविण्यात येत आहेत.

Top marathi serial list

Top marathi serial list

 

“रंग माझा वेगळा” मालिकेला मागे टाकत सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. वर्षा उसगावकर असलेल्या या गौरी जयदीप च्या प्रेमाला प्रेक्षकांकडून पसंती मिळाल्याने या मालिकेला दुसरे स्थान मिळाले आहे. परंतु या यादीत गेल्या दिवसांपासून चर्चेत असलेल्या “मुलगी झाली हो” या मालिकेने प्रथम स्थान मिळवले आहे.

Top marathi serial list

सध्या “मुलगी झाली हो” ही मालिका प्रचंड लोकप्रियता मिळविताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत सिद्धार्थ खिरीद या अभिनेत्याने एसीपी सिद्धांतच्या रूपाने एन्ट्री झाली आणि तेंव्हापासूनच मालिकेने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. सध्या मालिकेत सिद्धांत व शौनक माऊ सोबत जवळीकता साधायचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

Top marathi serial list

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *