गेल्या काही वर्षांपासून तेजश्री प्रधानने अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून खऱ्या अर्थाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच अभिनयाच्या जोरावर तेजश्री ने अग्गबाई सासूबाई मालिकेसाठी तेजश्रीला “सर्वोत्कृष्ट सून” हा पुरस्कार मिळविला आहे.

Zee awad got shubha


झी मराठी अवार्ड सोहळ्यात तेजश्रीला जरी हा पुरस्कार मिळाला असला तरी तो पुरस्कार नवीन शुभ्राने स्वीकारल्याने थोडासा गोंधळ उडाला होता. नवीन मालिका अग्गबाई सूनबाई मालिकेला नामांकन मिळाले नव्हते तरी तो अवार्ड उमा पेंढारकर या अभिनेत्रीला कसे काय दिला? हा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु आता दोघींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मुळे सर्वकाही स्पष्ट झाले आहे.

“सर्वोत्कृष्ट सून” हा पुरस्कार खरे तर तेजश्री प्रधान या अभिनेत्रीचा होता व तो उमा ने तेजश्रीसाठी स्वीकारला होता. उमाने इंस्टा स्टोरी मध्ये असे लिहिले, “तेजश्री प्रधान ताई मी काल तुझा अवार्ड घेण्यासाठी खूप उत्साहित होते. मनापासून शुभेच्छा तुला. समान ऊर्जेने ते पात्र साकारायला उत्सुक आहे.”

Zee awad got shubha

यावर उत्तर देताना तेजश्री म्हणाली, “खूप खूप धन्यवाद उमा. मला खात्री आहे की तू चमत्कार करशील आणि तू शुभ्रा मधून स्वतःचे नाव तयार करशील.” दोघींच्या या पोस्ट मुळे अनेक फॅन्सचा संभ्रम दूर झाला आहे. उमा देखील उत्तम अभिनय करीत असून पुढील सोहळ्यात तिला देखील पुरस्कार मिळू शकतो.

Zee awad got shubha

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *