Zee marathi awards

सध्या मराठी टिव्ही चॅनेलच्या अवॉर्ड सोहळ्याचे प्रसारण झालेले पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात कलर्स मराठी, या आठवड्यात झी मराठी तर पुढील आठवड्यात स्टार मराठीच्या सोहळ्याचे प्रसारण ठरविण्यात आले. सर्व अवार्ड सोहळ्याची शूटिंग संपली असून झी मराठी वरील कोणत्या मालिकेला जास्त अवार्ड मिळाले ते पाहुयात.


झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट जोडीचा मान माझा होशील ना? मालिकेतील सई-आदित्य यांना मिळाला. काही दिवसांपूर्वीच मालिकेत या दोघांचे लग्न झालेले पाहायला मिळाले होते. या दोघांच्या प्रेम कहाणीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्याचे दिसून आले. म्हणूनच या जोडीने वोटिंग मध्ये पहिला क्रमांक पटकाविला.

Zee marathi awards

झी मराठीच्या सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार देखील माझा होशील ना? या मालिकेने पटकाविला. तसेच, याच मालिकेतील ब्रम्हे कुटुंब सर्वोत्कृष्ट कुटुंबाचे मानकरी ठरले. तसेच सर्वोत्कृष्ट सासरे हा पुरस्कार ब्रम्हे मामाना देण्यात आला. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात माझा होशील ना मालिकेनेच सर्वात जास्त पुरस्कार मिळविण्याचा मान मिळविला आहे.

Zee marathi awards

“सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा” महिला गटातून देवमाणूस मलिकेतील सरू आज्जीला तर, त्याच मालिकेतील टोण्याला पुरुष गटातून हा पुरस्कार मिळाला. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेला सर्वोत्कृष्ट खलनायिका “मालविका”, सर्वोत्कृष्ट आई “शकू”, तर मालिकेची नायिका अवनी म्हणजेच स्वीटूला “लक्स गोल्डन” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

Zee marathi awards

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *