सोनी मराठी वाहिनी वर “आई माझी काळुबाई” ही मालिका सुरू झाल्यापासून मालिकेवर एका पाठोपाठ एक मोठी संकटे उभी राहिली. अगोदर सेटवर 22 जणांना कोरोनाची लागण झाली व त्यात एका ज्येष्ठ अभिनेत्रीला जीव गमवावा लागला. नंतर मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल व मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात वाद झाल्याने प्राजक्ता मालिकेतून बाहेर पडली.

Aai mazi kalubai serial news

S

प्राजक्ताच्या ऐवजी नंतर मालिकेत वीणा जगताप या अभिनेत्रीने “आर्या” हे पात्र साकारले. परंतु, काही दिवसांपूर्वी तब्येत ठीक नसल्याने वीणाने देखील मालिकेतून माघार घेतली. मालिकेचा टीआरपी चांगला असतानाच वीणाने घेतलेल्या या निर्णयामुळे मालिकेवर मोठे संकट निर्माण झाले होते. परंतु आता मालिकेत तिसरी अभिनेत्री दिसणार असून, आता आर्याच्या भूमिकेत रश्मी अनपट ही अभिनेत्री भूमिका साकारताना दिसत आहे.

Aai mazi kalubai serial news

 

आई माझी काळूबाई मालिकेच्या निर्मात्या अभिनेत्री अलका कुबल यांनी मात्र वीणाने मालिका का सोडली याबद्दल आणखीन स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु, आता दुसऱ्यांदा अभिनेत्री बदलावे लागणार असल्याने मालिकेवर काय परिणाम होणार हे येणारा काळच सांगेल. नवीन आर्या म्हणजेच रश्मी अनपट हीने यापूर्वी काही मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारताना दिसून आली आहे.

Aai mazi kalubai serial news

रश्मीने यापूर्वी फ्रेशर्स, अवताराची गोष्ट, कुलस्वामिनी अशा अनेक मालिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखविले आहे. रश्मी ही विवाहित असून तिला अडीच वर्षाचा एक मुलगा देखील आहे. आई माझी काळूबाई मालिकेच्या 1-2 भागात ती दिसून देखील आली आहे. रश्मीला व मालिकेच्या टीमला खूप खूप शुभेच्छा.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.