सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. या आधुनिक युगात एखाद्या व्यक्तीचे नशीब रातोरात बदलून जात असते. तसेच, अगोदरच सेलेब्रिटी असणाऱ्या काही कलाकारांचा एखादा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झालेला दिसून येतो. सध्या एका साऊथ अभिनेत्रीच्या एका व्हिडिओ मुळे तिच्या कडे अनेकजण आकर्षित झालेले पाहायला मिळत आहेत.

साऊथ मधील काही कलाकार यापूर्वीही रातोरात स्टार बनलेले आपण पाहिलं आहे. रश्मिका मंधना, प्रिया वारियर, अभिनेता विजय, यश यांनी सोशल मीडियावर लाखो चाहते कमविले. सध्या साऊथ चित्रपटातील अभिनेत्री जुही जयकुमार हीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओ मध्ये जुही मशीन द्वारे नाक टोचताना दिसून येत आहे. तसेच तिने नाकात खडा देखील घातला आहे. नाक तोचताना जुहीच्या चेहऱ्यावरील या एक्स्प्रेशन मुले युवा पिढीला आकर्षित केले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून यामुळे जुही चांगलीच फेमस झाली आहे.
जुही एक मल्यालम मॉडेल असून तिला यापूर्वी जास्त लोकप्रिय नव्हती. परंतु, या व्हिडिओ मुळे तिला बरीच लोकप्रियता मिळत आहे. लोकप्रियता ही नशिबाने मिळत असली तरी तिला जपूनही ठेवता आले पाहिजे. नाही तर राणू मोंडल सारखी अवस्था व्हायला वेळ लागत नाही.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरू नका