Amit Mistri death news

गेल्या वर्षभरात बॉलिवूड व अन्य क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर, इरफान खान, सुशांत सिंग राजपूत या सारख्या अनेक कलाकारांचे निधन झाल्याच्या वार्ता मिळाल्या. 2020 मध्ये वाईट होते असे वाटत असतानाच 2021 मध्ये देखील अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशातच आता बॉलिवुड मधून आणखीन धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Amit mistri


देशात सर्वत्र कोरोना ने हाहाकार माजविला असून अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज सकाळी बॉलिवुड अभिनेते अमित मिस्त्री या अभिनेत्याचे निधन झाले आहे. आज दिनांक 23 एप्रिल रोजी अमितला सकाळी नाश्ता केल्यानंतर अचानक छातीत दुखू लागले. घरातील सदस्यांनी दवाखान्यात नेण्या अगोदरच अमितने जीव सोडला होता.

Amit Mistri death news

अमितचे मॅनेजर महर्षी देसाई यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, मी खूपच शॉक झालो हे ऐकून. अमितला कधीच कसला त्रास नव्हता, तो तब्येतीने खूप चांगला होता. इंडस्ट्रीसाठी हे एक मोठे नुकसान आहे.” अमितच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला असून काही कलाकारांनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हीने देखील श्रद्धांजली वाहिली.

Amit Mistri death news
शोर : इन द सिटी, सात फेरो की हेरा फेरी, दफा 420, क्या केहना, यमला पगला दिवाना अशा अनेक चित्रपटात अमितने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच, मॅडम सर, सावधान इंडिया, तेनाली रामा अशा लोकप्रिय मालिकेत देखील काम केले होते. अमितच्या निधनाने एक उत्तम अभिनेता गमावला आहे. अमित मिस्त्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.

Amit Mistri death news

माहिती कशी वाटल ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *