भोपाळ – भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने आणेक राज्यात लॉक डाऊन केले असून, आता संपूर्ण देशच लॉक डाऊन च्या दिशेने जात आहे. लॉकडाऊन असलेल्या राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामध्ये लग्न-सोहळ्यावर देखील मर्यादा घालण्यात आल्या आहेत.


सध्या मध्य प्रदेशच्या रतलाम येथील एका लग्नाची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. रतलाम शहरामधील एका मंगल कार्यालयात चक्क कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णाचा विवाह सोहळा पार पडला. खरे तर हे लग्न काही प्रशासकीय अधिकारी व पोलिस यांच्या उपस्थितीत पार पडला.

Bhopal marriage news

रतलाम येथील एका तरुणाचे एका वर्षापूर्वीच एका मुलीसोबत लग्न जमले होते. लग्नाची तारीख 26 एप्रिल 2021 ही काढण्यात आली. परंतु, लग्नाच्या काही दिवस अगोदर म्हणजेच 19 एप्रिल रोजी मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सर्वांनी विचार करून अखेर पीपीई कीट घालून लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे जोडपे पीपीई किट घालून लग्न करणार आहेत, ही गोष्ट शहरात अनेकांना समजली. त्यामुळे मंगल कार्यालयाकडे पोलीस निरीक्षक आणि तहसिलदार यांनी धाव घेतली. परंतु, चर्चा करून लग्नाला परवानगी देण्यात आली. पीपीई कीट परिधान करुन लग्न केलेली ही जगातील पहिलीच घटना असावी. प्रशासनाने परवानगी दिल्याने हा लग्न सोहळा पार पडला. परंतु, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे रतलामचे तहसिलदार नवीन गर्ग यांनी सांगितले.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *