गेल्या काही महिन्यांपासून झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका लोकप्रिय ठरत आलेली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. परंतु सुरुवातीपासूनच या मालिकेत “डिंपल” नावाचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीला तर प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

Dev manus serial Dimple real


आज आपण डिंपल पात्र साकारणाऱ्या अस्मिता देशमुख या अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत. मालिकेत साधी दाखविण्यात आलेली व नेहमी मुझे बडी हिरोईन बनना है म्हणणाऱ्या डिंपलचा खऱ्या आयुष्यातील लुक पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही. पुण्याच्या देहू गावातून पुढे आलेल्या अस्मिताने पुण्यातूनच शिक्षण पूर्ण केले होते.

Dev manus serial Dimple real

एन. एच. स्कूल सांगवी व हुजूरपागा उच्च माध्यमिक शाळेतून अस्मिताने शालेय शिक्षण पूर्ण केले व नंतर तिने पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातून बीएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अभिनया व्यतिरिक्त अस्मिताला गाण्याची व चित्रकलेची देखील आवड असल्याचे समजते. अभिनय क्षेत्रात कसलाही कौटुंबिक वारसा नसून देखील अस्मिताने “देवमाणूस” मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले व त्यात ती यश देखील मिळवताना दिसून येत आहे.

Dev manus serial Dimple real

 

मालिकेत डिंपल व टोण्या या भावंडाच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. बोगस डॉक्टर अजितकुमार देवला त्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात डिंपल वाचविताना व मदत करताना दिसून येत आहे. तसेच, डॉक्टर आणि डिंपल यांच्या लग्नाची देखील तयारी चालू असलेली सध्या मालिकेत पाहायला मिळत आहे. अभिनयात यशस्वीरीत्या पदार्पण करणाऱ्या अस्मिताला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Dev manus serial Dimple real

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *