गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या कन्येला घेऊन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर सैफ करीनाच्या दुसऱ्या मुला बाबतीत पण अशीच चर्चा झाली. बाळाचा चेहरा इतक्यात न दाखवायची परंपरा मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री धनश्री काडगावकरने देखील चालू ठेवली आहे.

Dhanashree kadgaonkar new video


धनश्री ही अगोदरप्रमाणे गरोदरपणात देखील फोटोशूट करताना दिसून येत होती. दिनांक 28 जानेवारी रोजी धनश्रीने स्वतः पोस्ट करून पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे सांगितले होते. परंतु, तिने स्वतःचे व बाळाचे फोटोज् पोस्ट केले नव्हते. परंतु, आता ती बाळाचे फोटोज् व्हिडिओज पोस्ट करीत परत सोशल मीडियावर ॲक्टिव झालेली दिसून येत आहे. धनश्रीने आता तिच्या मुलासोबतचा आणखीन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Dhanashree kadgaonkar new video

गेल्या काही महिन्यात धनश्रीने बेबी बंपसोबत अनेक फोटो काढलेले दिसून आले होते. आता धनश्री ने बाळासोबतचा एक इंस्टाग्राम रील व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ती तिच्या मुला सोबत पावसाचा आनंद घेताना दिसून येत आहे. पुण्यात अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने चिमुकल्याचा पहिल्या पाऊस असल्याचे धनश्री व्हिडिओत सांगताना दिसून येत आहे.

या व्हिडिओ मध्ये धनश्री बाळाला “मन्या” या नावाने हाक मारताना दिसून येत आहे. परंतु त्या बाळाला मन्या हे फक्त लाडाने ठेवलेले नाव असून त्या बाळाचे बारसे झाले नसल्याचे समजते. धनश्री सध्या शुटींग पासून दूर असून ती तिचा पूर्ण वेळ बाळासाठी देत असलेले पाहायला मिळत आहे व त्यातच ती खूप आनंदी असल्याचे दिसून येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *