सेलिब्रिटींच्या घरी गेल्या काही महिन्यांपासून बाळाच्या आगमनाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. अभिनय क्षेत्रातील व क्रिडा क्षेत्रातील काही सेलिब्रिटींच्या घरात छोट्या पाहुण्याचे आगमन झाले तर काहींनी लवकरच बाळाचे आगमन होणार असल्याचे सांगितले. आता आणखीन एका बॉलिवुड अभिनेत्रीने प्रेग्नंट असल्याची बातमी फॅन्स सोबत शेयर केली आहे.

Diya mirza pregnancy news

S

काही दिवसांपूर्वी श्रेया घोषाल व नीती मोहन या 2 लोकप्रिय गायिकानी प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते. श्रेया घोषाल 37व्या वर्षी तर नीती मोहन 41व्या वर्षी प्रेग्नंट झाल्या असून आता बॉलिवुड अभिनेत्री दिया मिर्झा ही वयाच्या 39व्या वर्षी प्रेग्नंट झाली आहे. 15 फेब्रुवारी 2021 रोजी विवाहबद्ध झालेल्या दिया ने दीड महिन्यानंतर फॅन्सला ही आनंदाची बातमी सांगितली.

Diya mirza pregnancy news
दिया ही दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली असून तिचे यापूर्वी 2014 मध्ये दिग्दर्शक साहील संघा सोबत लग्न झाले होते. परंतु, साहील पासून विभक्त झाल्यानंतर दियाने वैभव रेखी सोबत दुसरे लग्न केले होते. दियाने आनंदाची बातमी शेयर करताना म्हटले, “माझ्या गर्भाशयातून सर्वात पवित्र शुद्ध स्वप्न सत्यात उतरणार आहे, त्याबद्दल मी देवाची आभारी आहे.”

या पोस्ट वर बॉलिवुड सेलिब्रिटी करीना कपूर, मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, श्रेया घोषाल, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा आदींनी शुभेच्छा वर्षाव केला. दिया मिर्झा व तिचे पती सध्या मालदीव येथे हनिमून साजरा करण्यासाठी गेले आहेत. तेथील दोघांच्या काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत. दियाच्या या बातमीने बॉलिवूड मधील आणखीन एका घरात लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार.

Diya mirza pregnancy news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *