स्टार प्रवाह वाहिनीवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं?” या मालिकेने आजपर्यंत घवघवीत यश मिळविले आहे. 17 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झालेल्या या मालिकेने टीआरपी मध्ये नेहमीच चांगले यश मिळविले आहेत. सर्वोत्तम मराठी मालिकांमध्ये बरेच दिवस एक नंबरला असणारी ही मालिका सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Gauri Jaydeep dance video

S

मालिकेतील गौरी व जयदीप या जोडीला देखील खूपच लोकप्रियता मिळालेली दिसून आली. या दोघांचे प्रेम व उत्तम अभिनय यामुळेच “सुख म्हणजे नक्की काय असतं”? या मालिकेला यश मिळू शकले. तसेच, मालिकेत माईची भूमिका साकारणारी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा देखील मालिकेच्या यशात महत्त्वाचा वाटा आहे.

Gauri Jaydeep dance video

काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीचा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात “सुख म्हणजे काय असतं?” या मालिकेला उत्तम यश प्राप्त झाले होते. या मालिकेतील जयदीप-गौरी यांनी त्या पुरस्कार सोहळ्यात “तोळा तोळा” या गाण्यावर डान्स केला होता. त्याच डान्सचा सराव करतानाचा रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सुख म्हणजे काय असतं? मालिकेत गौरी ही जयदीपच्या मित्राच्या वाढदिवसाला नकार देत आहे. परंतु, जयदीप गौरीसोबत कोड्याचा खेळ खेळून तो जिंकल्यास गौरीला पार्टीला यावे लागेल असे म्हणतो. नंतर जयदीप कोड्याची पैज जिंकतो व गौरी पार्टी साठी तयार होणार असल्याचे दिसून येणार आहे. त्यामुळे मालिकेत गौरीचा मॉडर्न लुक पाहायला मिळणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Gauri Jaydeep dance video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *