झी मराठी वाहिनीवर सध्या माझा होशील ना? ही मालिका खूपच लोकप्रिय होताना दिसून येत आहे. टीआरपी बाबतीत देखील ही मालिका झी मराठीची नंबर एक मालिका आहे. तसेच, झी मराठी अवार्ड सोहळ्यात देखील या मालिकेला सर्वात जास्त पुरस्कार मिळाले होते. येणाऱ्या काही दिवसात या मालिकेत काही सुंदर क्षण पाहायला मिळणार आहेत.

Gautami deshpande latest

S

माझा होशील ना? मालिकेत सध्या आदित्य ग्रूप कामगाराच्या वस्ती बाबत आदित्य व जेडी यांच्यात वाद चालू असलेला पाहायला मिळत आहे. परंतु पोलीस आल्याने हा वाद सध्या तरी शांत झालेला दिसून आला. दुसरीकडे ब्रम्हे भावंडांनी सई व आदित्यच्या हनीमून साठी मनाली ट्रीपचे आयोजन केले व दोघांना याबाबतीत सरप्राइज दिले.

Gautami deshpande latest

सई-आदित्य यांनी या निर्णयाला विरोध करीत सर्व ब्रम्हे कुटुंब एकत्रित मनालीला जाण्याचे ठरविले. त्यानुसार आता येणाऱ्या काही भागात मनाली येथे शूट केलेली दृश्ये पाहायला मिळणार आहेत. मालिकेची तेथील शुटींग संपली असून तिथे सईने म्हणजेच गौतमी देशपांडे हीने तिच्या मधुर आवाजात “ये ईश्क हाये” ही गाणे गात मनसोक्त आनंद घेताना दिसून येत आहे.

तसेच, गौतमी ने बंधू मामा सोबत देखील “इन हवाओ मे” हे गाणे उत्तमरीत्या गायलेले दिसून येत आहे. एका व्हिडिओ मध्ये तर सई डान्स करतेय व आदित्य कडाक्याच्या थंडीत मध्ये अकडून गेल्याचे पाहायला मिळत आहे. मनालीच्या 2 डिग्री सेल्सिअस तापमानात होत असलेल्या शुटींगचे एपिसोड्स पाहायला प्रेक्षक देखील उत्सुक असणार हे नक्की आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *