स्टार प्रवाह वाहिनीवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं?” या मालिकेने आजपर्यंत घवघवीत यश मिळविले आहे. 17 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झालेल्या या मालिकेने टीआरपी मध्ये नेहमीच चांगले यश मिळविले आहेत. सर्वोत्तम मराठी मालिकांमध्ये बरेच दिवस एक नंबरला असणारी ही मालिका सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Girija prabhu viral


मालिकेतील गौरी व जयदीप या जोडीला देखील खूपच लोकप्रियता मिळालेली दिसून आली. या दोघांचे प्रेम व गौरीचा उत्तम अभिनय यामुळेच “सुख म्हणजे नक्की काय असतं”? या मालिकेला यश मिळू शकले. आज आपण गौरीची भूमिका उत्तमरीत्या साकारणाऱ्या गिरीजा प्रभू या युवा अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत.

Girija prabhu viral

अभिनेत्री गिरीजा प्रभू हीचा जन्म 27 नोव्हेंबर 2000 मध्ये गोव्यात झाला. त्यानंतर ती पुणे शहरात लहानाची मोठी झाली. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून बीए ची पदवी घेतल्यानंतर ती अभिनयासाठी सध्या मुंबईत राहते. फक्त 20 वर्षातच गिरीजाने अभिनय क्षेत्रात उत्तम यश प्राप्त केले आहे. मालिकेत येण्यापूर्वी गिरीजाने काय झालं कळेना, कौल मनाचा या चित्रपटात देखील काम केले आहे.

वयाच्या 12 वर्षीच गिरीजाने टाईम प्लीज या चित्रपटातून बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. अभिनया सोबतच ती एक उत्तम डान्सर देखील असून काही महिन्यांपूर्वी ती युवा डान्सिंग क्वीन या स्पर्धेत दिसून आली होती. ती तिचे नेहमीच डान्स व्हिडिओ पोस्ट करताना दिसून येत असते. सध्या गौरीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकवर्गाची ती आवडती झाली आहे. गिरीजा प्रभू या युवा प्रतिभावंत अभिनेत्रीला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Girija prabhu viral

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *