काल दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी अभिनय क्षेत्रातील एक उत्तम कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार घेत असलेले किशोर नांदलस्कर या ज्येष्ठ अभिनेत्याने अखेर शेवटचा श्वास घेतला. 2 आठवड्यापासून ते ठाण्यातील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असताना काल दुपारी त्यांचे निधन झाले.

Kishor nalandskar video


किशोर नांदलस्कर यांनी मराठी व हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. किशोर यांनी चित्रपटासोबतच काही मालिका व नाटकात देखील काम केले होते. जिस देश में गंगा रहती है चित्रपटातील त्यांची सन्नाटा नामक साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आजही स्मरणात आहे. तसेच, किशोर यांनी वास्तव, खाकी, सिंघम, सिंबा अशा चित्रपटात देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या.

सध्या किशोर नांदलस्कर यांचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या वाढदिवसाचा असून 17 मार्च रोजी त्यांनी शेवटचा वाढदिवस साजरा केला. किशोर हे “चॅलेंज” या हिंदी चित्रपटात काम होते. त्या चित्रपटाचे निर्माते विजय अर्जुन व सुजाता बत्तीन यांनी या वाढदिवसाचे सरप्राईज दिले होते. व्हिडिओ मध्ये ते अगदी आनंदाने नाचताना दिसून येत आहेत.

 

वाढदिवस साजरा करताना त्यांच्या सह मित्र परिवाराला वाटले नव्हते की हा त्यांचा शेवटाचा वाढदिवस असेल. आणखीन एका व्हिडिओ मध्ये किशोर नांदलस्कर हे त्यांच्या आवडीचे “घर से निकलते ही” हे गाणे गाताना दिसून येत आहेत. त्यांना कोणीही गाणे गायला सांगितले की ते हेच गाणे गायचे. त्यांच्या जाणाने चित्रपट सृष्टीने एक उत्तम कलाकार गमावला आहे. किशोर नांदलस्कर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *