लोकप्रियतेच्या बाबतीत सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते? ही मालिका अग्रेसर दिसून येते. जवळपास दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेला घराघरांतून प्रेम मिळाले. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी या यशाचे श्रेय जाते. परंतु, सर्वात श्रेय मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला जास्त जाते.

Madhurani prabhulkar biography


आई कुठे काय करते? या मालिकेत अरुंधती नामक आईचे पात्र मधुराणी प्रभुलकर या अभिनेत्री ने साकारले आहे. मालिकेच्या सुरुवाती पासूनच मधुराणी या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाचा प्रभाव टाकला आहे. म्हणूनच ती सध्या अनेकांची आवडती अभिनेत्री ठरत आहे. इतके अभिनय कौशल्य असणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात काय करते हे जाणून घेतल्यास आश्चर्य वाटेल.

मधुराणी प्रभुलकर या सध्या मुंबईत वास्तव्यास असून त्या एका नावाजलेल्या ॲक्टिंग अकॅडमीला चालवतात. मधुराणी व त्यांचे पती प्रमोद प्रभुलकर हे दोघे “मिरॅकल्स ॲक्टींग अकॅडमी” चालवितात. या अकॅडमी मधून आजपर्यंत असे काही उत्तम कलाकार समोर आले आहेत, ज्यांनी मालिका क्षेत्रात लोकप्रियता मिळविली आहे.

Madhurani prabhulkar biography

मधुराणी यांच्या मिरॅकल अकॅडमी मधून ऋता दुर्गुळे(फुलपाखरू), शिवानी बावकर(लागीर झालं जी), निखिल चव्हाण(कारभारी लयभारी), गिरिजा प्रभू(सुख म्हणजे नक्की काय असतं), किरण गायकवाड(देवमाणूस) हे कलाकार पुढे आले आहेत. स्वतः अभिनयाचे धडे देत असल्यानेच मधुराणी यांच्या अभिनायची जादू प्रेक्षकांना दिसून येत असते.याच कारणाने अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वी म.टा. कडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा हा पुरस्कार मिळाला होता.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *