सोशल मीडियावर कलाकार त्यांचे फोटोज् व व्हिडिओज पोस्ट करून फॅन्सचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही फॅन्सना या व्हिडीओज आवडतात व ते चांगल्या कमेंट करीत असतात. परंतु काही युजर्स विनाकारण कलाकारांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. असाच काहीतरी प्रकार अभिनेत्री मानसी नाईक तिच्या सोबत घडला आहे.

Mansi reply to user comment


मानसी नाईकने इंस्टाग्राम वर लाईव्ह येऊन ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले. तेव्हा बोलताना “तू बुधवार पेठ मधील रां** आहेस” अशी कमेंट एका युझरने केल्याचे मानसीने सांगितले. त्यावर मानसीने त्या युजरला उत्तर देताना मानसी म्हणाली, “मी बुधवार पेठेतील आहे, तुम्ही मला तिथे कधी बघितलंत व मला तिथे बघायला तुम्ही तिथे काय करीत होतात.”

Mansi reply to user comment

“बुधवार पेठ ही जागा ज्या बायका चालवतात त्या कशासाठी हे करतात? कारण, ते स्वतःच पोट भरीत आहेत, त्यांना पण स्वतःच अस्तित्व आहे व ते मेहनत करतात. हा विचार न करता कोणीही एखाद्या अभिनेत्रीला सहजरीत्या ती शिवी दिली जाते. त्या बायका घर चालवण्यासाठी छाती ठोकून करतात. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही करून दाखवा” असे मानसीने जोरदार प्रत्युत्तर दिले.

 

काही महिन्यांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिने बॉक्सर प्रदीप खरेला याच्याशी लग्न केलं होते. त्यावरून देखील तिला युझर्स नी मराठी मुलगा लग्नासाठी भेटला नाही का असे ट्रोल केले होते. मानसी सोबत अभिनेत्री सीमा कदम व दिग्दर्शिका विशाखा हरिश्चंद्र हे देखील लाईव्ह होते व फक्त ट्रोलर्सना चपराक देण्यासाठीच ते लाईव्ह आले होते.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *