गेल्या वर्षी अभिनयक्षेत्रात 2 दुःखद घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या. एकीकडे बॉलिवुडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केलेली बातमी ऐकायला मिळाली, तर दुसरीकडे मराठी अभिनेता आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्याची दुःखद बातमी समोर आली. या दोन्ही गोष्टीमुळे अनेकांना धक्का बसला होता.

Mayuri ashitosh bhakare news


आशुतोष भाकरे या अभिनेत्याची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख ही आहे. या घटनेमुळे काळाने मयुरीवर मोठा घात केला होता. त्यातून तिला सावरायला बराच वेळ लागला होता. मयुरीने नंतर काही महिन्याने या दुःखातून सावरत इमली या हिंदी मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. त्यामुळे तिने दुःख मागे सारत नव्या आयुष्याची सुरुवात केली होती.

Mayuri ashitosh bhakare news

पतीच्या निधनाच्या इतक्या महिन्यानंतर मयुरीने एका मुलाखतीत दुसऱ्या लग्नाबद्दल विचारणा केल्यास मन जिंकणारे उत्तर दिले आहे. मयुरी म्हणाली, “आशुतोषच्या जाण्याचे दुःख माझ्यासाठी आभाळ कोसळण्यासारखेच होते. सर्वांनी मला यातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली. माझं आजही आशुतोषवर मनापासून प्रेम आहे. त्याला त्याच्या भाच्चीवर खूप प्रेम होते आणि मुळात त्याला लहान मुले खूप आवडायची.”

Mayuri ashitosh bhakare news

 

दुसऱ्या लग्नाबाबत विचारल्यास मयुरी म्हणाली, “आशुतोषला मुले आवडत असल्याने मी 1-2 लहान मुले दत्तक घेण्याचा विचार करीत आहे. मुले असतील तर दुसरे लग्न करण्याची काय आवश्यकता आहे. मी त्यांना घेऊन आनंदी राहू शकेल.” मयुरीचे हे उत्तर वाचून तिचे आशुतोषवर असलेले प्रेम स्पष्टपणे दिसून येते व या उत्तराने तिने अनेकांची मने जिंकली आहेत.

Mayuri ashitosh bhakare news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *