देवमाणूस ही मालिका सध्या झी मराठी वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका असलेली दिसून येत आहे. कारण, मराठी सीरिअल्सच्या टीआरपीच्या यादीत देवमाणूस ही मालिका 5व्या क्रमांकावर असून टॉप 5 मध्ये झी मराठीची ही एकमेव मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या पात्राला योग्य तो न्याय दिला आहे.

Neha khan viral video


सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या या मालिकेत बोगस डॉक्टर अजित कुमार देव, डिंपल, टोन्या, आज्जी, मंजुळा, एसीपी दिव्या सिंग, बज्या, नाम्या अशा अनेक पात्रांनी आपापली छाप पाडली आहे. मालिकेत सध्या अजित कुमार देव हा दिव्या सिंगला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात पाडून त्याच्यावरील संशय करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Neha khan viral video

मालिकेत जरी दिव्या व डॉक्टर यांचे प्रेम फुलताना दिसत असले तरी खऱ्या आयुष्यात दिव्याचा म्हणजेच अभिनेत्री नेहा खानचा बज्या सोबतचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. “बारीश की जाये” या ट्रेंडिंग गाण्यावर नेहा खान व किरण डांगे(बज्या) दोघेही रोमँटिक डान्स करताना दिसून येत आहेत. साद पावसाचे आगमन झाल्याने या दोघांना डान्स करण्याचा मोह झाला.

या दोघांनी केलेल्या सुंदर व्हीडिओला हजारो फॅन्स नी लाईक केलेले दिसून आले. तसेच, देवमाणूस मालिकेच्या काही फॅन्सनी मजेशीर कमेंट केलेल्या पाहायला मिळाल्या. “बज्या आता तुला 1 गोळी आणि कायमचा आराम”, “डॉक्टरला तुमचे लोकेशन पाहिजे आहे” अशा गमतीशीर कमेंट फॅन्सनी केल्या. काहीही असो या दोघांची व्हिडिओ सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

Neha khan viral video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *