झी मराठी वाहिनीच्या आजपर्यंतच्या मालिकांपैकी सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजेच रात्रीस खेळ चाले ही होय. प्रेक्षकांचे प्रेम पाहता या मालिकेचे तिसरे पर्व काही दिवसांपूर्वी सुरू झाले. रात्रीस खेळ चाले-3 मध्ये अण्णा नाईकांना सध्या तरी जास्त दाखविण्यात येत नाही. या मालिकेत कावेरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री बद्दल जाणून घेऊयात.

Ratris khel chale viral

S

पहिल्या 2 पर्वापेक्षा हे पर्व थोडेसे वेगळे दाखविण्यात येत आहेत. तरीही मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. अण्णा व माईचा मुलगा अभिराम व त्याची पत्नी कावेरी हे उत्तम अभिनय साकारताना दिसून येत आहेत. कावेरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव भाग्या नायर आहे. मूळची केरळ मधील असणाऱ्या भाग्याने मालिकेतील कावेरीच्या भूमिकेमुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

मालिकेत मल्याळम भाषा बोलणारी भाग्या खरे तर खूप वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे व तिला उत्तम मराठी भाषा देखील येते. मालिकेत तिच्या अंगात शेवतांचा आत्मा आलेले दाखविण्यात येत असल्याने ती मालिकेचा महत्वपूर्ण भाग आहे. सध्या भाग्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ती उखाणा घेताना दिसून येत आहे.

 

हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा असून “इट्स सर्च” यूट्यूब चॅनेल वरील आहे. भाग्या नायरने मालिकेत येण्यापूर्वी अनेक काही यूट्यूब चॅनेल आणि वेब सीरिज मध्ये काम केले आहे. तसेच, तिने काही मराठी नाटकांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. मल्याळम भाषिक मुलगी मुंबईत येऊन यश प्राप्त करीत असल्याने सर्वांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे. भाग्या नायरला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Ratris khel chale viral
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *