कलाकारांना मिळालेल्या पात्रानुसार अभिनय क्षेत्रात पुढे चालत राहावे लागते. कधी कधी काही कलाकार खऱ्या आयुष्यापेक्षा इतके वेगळे पात्र साकारत असतात की त्यांना ओळखणे देखील कठीण होते. सध्या सुरू असलेल्या “रंग माझा वेगळा” या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री बाबतीत देखील असेच काहीतरी आहे.

Reshma shinde viral video


गेल्या काही दिवसांपासून टीआरपी मध्ये टॉप 5 असणाऱ्या “रंग माझा वेगळा” मालिकेत दीपा नामक पात्र रेश्मा शिंदे ही अभिनेत्री साकारत आहे. मूळची मुंबईची असलेली रेश्मा ही अभिनय क्षेत्रात खूप वर्षांपासून काम करते. तिच्या यापूर्वी बंध रेशमाचे, लगोरी – मैत्री रिटर्न्स या रेशमाच्या काही गाजलेल्या मालिका होत्या. सध्या रेश्माचा पडद्या मागील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

“रंग माझा वेगळा” या मालिकेत सध्या दीपाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. परंतु, कार्यक्रमात कार्तिक ने दिपा व सुजय यांचे प्रेम संबंध चालू असून दिपाच्या पोटात असलेले बाळ माझे नसल्याचे म्हणतो. परंतु, नंतर दिपा कार्तिकला चांगलाच समज दिल्याचे दाखविण्यात आले. मालिकेत जरी अशा घटना घडत असल्या तरी दिपा ऑफ स्क्रीन “वाथी कमिंग” या गाण्यावर ठुमकताना दिसून येत आहे.

या डान्स व्हिडिओ मध्ये ती गरोदर असून नाचत असल्याचे हावभाव दाखवीत आहे. “रंग माझा वेगळा” ही मालिका समाजात होत असलेल्या वर्णभेद यावर भाष्य करणारी आहे. मालिकेची अभिनेत्री रेशमा खऱ्या आयुष्यात गोरी असून देखील तिने दीपा नामक पात्र साकारून वर्णभेद करणाऱ्यास चपराक लगावली आहे. तिचे या मालिकेतील अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जाते.

Reshma shinde viral video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *