संपूर्ण देशाची लोकप्रिय जोडी रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसून येत असते. कोणताही सण, कोणताही प्रसंग असला तर हे दोघे व्हिडिओ द्वारे किंव्हा फोटो द्वारे व्यक्त होताना दिसतात. तसेच, या दोघांचे प्रेम किती घट्ट आहे, याचा प्रत्यय हे दोघे नेहमीच देत असतात. त्यामुळे या दोघांच्या प्रत्येक पोस्ट चर्चेचा विषय ठरत असतात.

Ritesh deshmukh new video

S

रितेश व जेनेलिया या दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आज देखील गुढी पाडव्याच्या निमित्ताने दोघांनी स्वतःचा व्हिडिओ पोस्ट केलेला दिसून आला. “क्या खूब लगती हो” या गाण्यावर दोघनी इंस्टाग्राम रील व्हिडिओ बनविले.

 

रितेश ने वरील व्हिडिओ नंतर एका मराठी गाण्यावर रील व्हिडिओ बनवून मराठी भाषेवरील प्रेम दाखवून दिले. सध्या “एक नारळ दिलाय” या मराठी गाण्याने सर्वांनाच वेड लावून सोडले आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींनी या गाण्यावर यापूर्वी स्वतःचे व्हिडिओ बनविले होते. आता रितेश देशमुख याला देखील या गाण्यावर नाचण्याचा मोह आवरता आला नाही.

रितेश ने वरील व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शन मध्ये असे लिहिले, “मी ‘नारलन पाणी’ या गाण्याच्या प्रेमात पडलो आहे.” या गाण्या आजपर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहेत. या गाण्यामुळे मराठी गाण्यामध्ये आधुनिकता आल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच रितेशला देखील या गाण्यावर प्रेम झालेले असावे.

Ritesh deshmukh new video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *