गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांचे लग्न झालेले पाहायला मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका पाठोपाठ एक साखरपुडा व विवाह सोहळे झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर, तेजपाल वाघ, कार्तिकी गायकवाड, अभिज्ञा भावे, मानसी नाईक यांचा समावेश होता. आता या यादीत आणखीन 2 मराठी कलाकारांचा समावेश झाला आहे.

Rucha apte marriage news

S

काही महिन्यांपूर्वी संपलेली मालिका तुझ्यात जीव रंगला या मालिकेत दिसून आलेली अभिनेत्री ऋचा आपटे ही आज दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी विवाहबंधनात अडकली आहे. ऋचा हीने मुळशी पॅटर्न फेम अभिनेता क्षितीज दाते या अभिनेत्यासोबत लग्न केले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता.

Rucha apte marriage news
ऋचा व क्षितीज या दोघांचे लग्न गेल्याच वर्षी होणार होते. परंतु, कोरोनामुळे दोघांनी लग्न पुढे ढकलले होते. कोरोनाची महामारी थांबायचे नाव घेत नसल्याने घरातील काही मोजक्याच परिवाराच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडल्याचे समजते. या दोघांना शिवानी रांगोळे, आशुतोष गोखले, यशोमन आपटे अशा अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Rucha apte marriage news

ऋचा आपटे हीने तुझ्यात जीव रंगला मालिकेत प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. ती सध्या सोनी मराठी वाहिनीवरील “असं माहेर नको ग बाई” या मालिकेत दिसून येत आहे. क्षितिज दाते सोबत ऋचा बन मस्का मालिकेत दिसून आली होती. क्षितिजची मुळशी पॅटर्न मालिकेतील गण्या हे पात्र प्रेक्षकांना खूप भावले होते. ऋचा आपटे व क्षितीज आपटे या दोघांना वैवाहिक आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.

Rucha apte marriage news
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *