1 महिन्यापूर्वी म्हणजेच 2 मार्च 2021 रोजी झी मराठी वाहिनीवर “पाहिले न मी तुला” ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेला सुरुवातीच्या काही भागापासूनच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत आशय कुलकर्णी व तन्वी मुंडले हे नायक नायिकेच्या भूमिकेत असून शशांक केतकर प्रथमच खलनायिकाच्या भूमिकेत दिसून येत आहे.

Shashank ketkar dance video

S

“पाहिले न मी तुला” मालिकेत मनु व अनिकेत या दोघांनी मंदिरात गपचुप लग्न केले होते. याचा संशय समरला आल्याने तो नेहमीच मनुकडे संशयाच्या नजरेने पाहतो व तिच्या घरी नेहमीच मनूच्या लग्नाची तयारी करायला सांगतो. म्हणून सध्या मनु अनिकेतच्या नात्यात समर हा मुख्य अडथळा ठरताना दिसून येत आहे. सध्या याच तिघांचा एक डान्स व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.

Shashank ketkar dance video

तामिळ भाषेतील “मास्टर” चित्रपटाच्या “वाथी कमिंग” या गाण्यावर आजवर अनेक सेलिब्रिटींनी डान्स व्हिडिओज बनविलेले पाहायला मिळाले. आता शशांक, आशय व तन्वी यांनी देखील या गाण्यावर डान्स केला आहे. रंगपंचमीच्या शूटिंग दरम्यान त्यांनी हा व्हिडिओ बनविला खरा, परंतु या व्हिडिओ मधील शशांकचा डान्स पाहून अनेकांना हसू आवरले नाही. शशांकची पत्नी प्रियंकाने देखील त्याच्या डान्स बद्दल भन्नाट कमेंट केली.

प्रियंका म्हणाली, “आवरा, तुला खरेच मी शिकवलेल्या डान्सच्या धड्याची गरज आहे शशा”. ही कमेंट करून प्रियंकाने देखील अप्रत्यक्षरित्या शशांकला जराही डान्स येत नसल्याचे सांगितले. प्रियंकाच्या कमेंटला अभिनेता अभिजित खांडकेकर याने “नाचू दे ग त्याला प्रियंका, शशांक तू नाच बिंदास,” असा रिप्लाय दिला. अभिनयात अव्वल असलेल्या शशांक डान्स मध्ये मात्र झिरो असल्याचे दिसून आले.

Shashank ketkar dance video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *