झी मराठी वाहिनीवरील “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 2 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना प्रेक्षकवर्ग भरभरून प्रेम देताना दिसून येत आहेत. आज आपण या मालिकेचा अभिनेता ओम म्हणजेच शाल्व किंजवडेकर खऱ्या गर्लफ्रेंड बद्दल जाणून घेणार आहोत.

Shreya Daflapurkar birthday special


येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेद्वारे शाल्व यांने पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत त्याने साकारलेली ओमची भूमिका पाहून अनेकांनी मराठी इंडस्ट्रीला नवीन चॉकलेट बॉय मिळाला असल्याचे म्हटले. मालिकेत स्वीटू बद्दल प्रेम दाखविणारा शाल्वची खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंड एखाद्या अभिनेत्री पेक्षा पण सुंदर दिसते.

Shreya Daflapurkar birthday special

शाल्वच्या खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंडचे नाव श्रेया डफलापुरकर हे आहे. 25 एप्रिल रोजी शाल्वचा वाढदिवस असल्याने श्रेयाने त्याला शुभेच्छा देताना मनातील भावना व्यक्त केल्या. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी प्रेमावर जरा जास्त विश्वास ठेवते, याला तू एकमेव कारण आहेस. तू माझ्या आयुष्यातल्या प्रकाश आणि शक्ती हो. तू परत येण्याची आता वाट पाहू शकत नाही. माझे घर असण्यासाठी धन्यवाद.”

Shreya Daflapurkar birthday special

शाल्व सध्या मालिकेच्या शुटींग साठी पर राज्यात असल्याने श्रेयाला त्याची आठवण येत असल्याचे दिसून येत आहे. शाल्व व श्रेया हे दोघे खूप अगोदर पासून एकमेकांना डेट करीत होते. श्रेया ही जरी अभिनेत्री नसली तरी ती कलाक्षेत्रासंबंधी महत्वाची कामे करते. “तलम” या कपड्याच्या ब्रँडची को फाऊंडर आहे. मराठी अभिनय क्षेत्रात अनेक कलाकारांची कपडे या ब्रँड मधून पुरविले जातात. म्हणूनच श्रेयाचे नाव देखील एखाद्या अभिनेत्री सारखेच लोकप्रिय आहे.

 

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *