मराठी मालिकांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत सध्या सर्वात टॉपला “मुलगी झाली हो” ही मालिका दिसून येत आहे. स्टार प्रवाह वरील या मालिकेने टीआरपी मध्ये आघाडीला राहून नेहमीच सातत्य ठेवले आहे. सध्या मालिकेत रंजक गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत.

Siddharth khirid viral video

S

काही दिवसांपूर्वी मालिकेत विलास पाटील व सरदेशमुख यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला. हा वाद चालू असतानाच विलास पाटलांचा मुलगा रोहन हा सरदेशमुख यांना ढकलून देतो. परंतु, यात विलास पाटील हे अडकतात. परंतु त्यांची मुलगी माऊ हा आरोप स्वतःवर घेऊन वडिलांना आरोपमुक्त केलेले दाखविण्यात आले.

Siddharth khirid viral video

 

या सर्व प्रकरणात खऱ्या आरोपीला पकडण्यासाठी मालिकेत सिद्धार्थ खिरीद या अभिनेत्याची एन्ट्री झालेली दाखविण्यात आली. सिद्धार्थने एसीपी सिद्धांत भोसलेचे पात्र अतिशय उत्तमरीत्या साकारलेले दिसून येत आहे. सिद्धांत ने नंतर आरोपी रोहनला जेरबंद करून माऊची जेलमधून मुक्तता केली.

Siddharth khirid viral video

 

सध्या मालिकेत सिद्धांत माउच्या प्रेमात पडताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या दोघांचे प्रेमळ सीन पाहण्याची उत्सुकता वाटत असते. ऑन स्क्रिन जसे या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे, तसेच ऑफ स्क्रीन देखील या दोघांनी आपल्या डान्स द्वारे धमाल केली आहे. त्यांचा सध्या “माझी राधा कुठे गेली बघा” या गाण्यावर केलेला डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे.

 

माऊ व सिद्धांत यांचा “मला उडू उडू झालया” या गाण्यावरील डान्स ने देखील फॅन्सना भुरळ घातली आहे. या मालिकेत येण्यापूर्वी सिद्धार्थ ने जाडूबाई जोरात, एक होती राजकन्या, फ्रेशर्स अशा अनेक मालिकेतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. “मुलगी झाली हो” मालिकेत देखील तो आपल्या अभिनयाची छाप पाडताना दिसून येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *