देशभरात सर्वत्र कोरोना ने परत एकदा थैमान घातले आहे. त्यामुळे रोज हजारो लोकांच्या निधनाच्या वार्ता ऐकावयास मिळत आहेत. गेल्या वर्षी अभिनय क्षेत्रातील काही दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला होता. आता परत अभिनय क्षेत्रातील एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

South Indian actor death news


साऊथ इंडस्ट्री मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना खळखळून हसविणारे जेष्ठ अभिनेते विवेक यांनी जगाचा निरोप घेतला आहे. 16 एप्रिल रोजी विवेक यांना हृदयविकाराचा झटका आल्याने चेन्नईच्या एका दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. ते निधनापूर्वी आयसीयू मध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली होते. परंतु, आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास विवेक यांची प्राणज्योत मावळली.

विवेक यांच्या निधनाची घटना वाऱ्यासारखी देशभरात पसरली व सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या अभिनय कौशल्याने गेली 3-4 दशके प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या विवेकच्या अकाली निधनाची वार्ता अनेकांना धक्का देऊन गेली. विशेष करून झटका येण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 15 एप्रिल रोजी विवेक यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

South Indian actor death news

 

लस घेतल्यानंतर विवेक यांनी असे म्हटले होते, “लस कोविडची लस एकदम सेफ आहे, ही लस घेतल्यानंतर आपण आजारी पडणार असे अनेकांना वाटते. पण तरीही काळजी घ्यावीच लागेल, लस मुळे आपली रिस्क होवू शकते.” विवेक यांनी रजनीकांत, कमल हसन, विजय, माधवन अश्या दिग्गज अभिनेत्या सोबत कामे केले असून त्यांना त्यांच्या याच योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अभिनेते विवेक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

South Indian actor death news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *