स्टार प्रवाह वाहिनीवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं?” या मालिकेने आजपर्यंत घवघवीत यश मिळविले आहे. 6 महिन्यापूर्वी सुरू झालेली ही मालिका अल्पावधीतच टीआरपी मध्ये अग्रेसर राहिलेली दिसून आली. सर्वोत्तम मराठी मालिकांमध्ये काही दिवसांपूर्वी एक नंबरला असणारी ही मालिका आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Sukh mhanje nakki kay asat serial


गौरी व जयदीप या जोडीला देखील खूपच लोकप्रियता मिळालेली दिसून आली. या दोघांचे प्रेम उत्तमरीत्या दाखविल्याने “सुख म्हणजे नक्की काय असतं”? या मालिकेला यश मिळू शकले. तसेच, लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी देखील आईच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. याच मालिकेतील कपिल व उदय यांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.

Sukh mhanje nakki kay asat serial

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शिर्के पाटील यांच्या 3 मुलांपैकी कपिल व उदय ही 2 आहेत. या दोघांचा एक व्हिडिओ एक व्हायरल होत असून ज्यात ते दोघे “शंकरपाळ्या”चा रिमेक करत आहेत. काही दिवसांपूर्वी 2 लहान मुलांचा भांडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी याबद्दल व्हिडिओ बनविले होते.

मल्हार व उदय ची भूमिका साकारणारे कपिल होनराव व संजय पाटील हे नेहमीच सोशल मीडियावर असे व्हिडिओ पोस्ट करून फॅन्स चे मनोरंजन करीत असतात. मालिकेत जयदीप व गौरीचा लाड करणारे व माईच्या शब्दा पलीकडे न जाणारे हे दोघे खऱ्या आयुष्यात मात्र खूप धमाल करताना दिसून येत असतात. या सर्वांच्या उत्तम अभिनयामुळेच मालिकेला यश मिळत आहे.

Sukh mhanje nakki kay asat serial

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *